संजय लांडगे,वाडा
वाडा येथे अंमली पदार्थाची वाहतुक करणाऱ्या दोघांना अटक,
खोडाळा-वाडा येथे एका वाहनातुन अंमली पदार्थांची अवैधरित्या वाहतुक होणार आहे,अशी खात्रीलायक माहीती मिळाल्यानंतर पोलीसांनी सापळा रचून हारोसाळे गावाच्या हद्दीत सायं.५.४५ सुमारांस खोडाळा बाजुकडुन आलेल्या कारला हारोसाळे तलावाजवळ अडवले.पोलिसांच्या सूचनेनुसार कारचालकाने रस्त्याच्या बाजूला कार उभी केली.त्यावेळी त्या मोटार कारमध्ये दोन इसम बसले होते.फारुक नजीर शेख, ( वय ५३ ) व अविनाश दिलीप राजभोज, (वय २७) दोघे राहणार अस्वली स्टेशन,ता. इगतपुरी,अशी त्यांची नावे असुन पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.त्यांच्या वाहनाची तपासणी केली असता चालकांच्या सिटच्या मागच्या बाजुस एक काळया-पिवळसर रंगाचे २ बॉक्स सापडले.कारमध्ये सापडलेल्या मालाबाबत इसमांकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्या पिशव्यामध्ये गांजा असल्याचे त्यांनी सांगितले.पोलिसांनी सदर पिशव्या व बॉक्स उघडून पाहीले असता,त्यामध्ये गांजा हा अंमली पदार्थ असल्याचे स्पष्ट झाले.सदर इसमांकडुन गांजा,वाहन व मोबाईल असा एकूण ३ लाख ३५ हजार ७५ रु.चा माल हस्तगत केला आहे. याप्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ बाळगल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.दोन्ही आरोपींना शनी.पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

