संजय लांडगे,वाडा,
जिल्हा परिषद शाळेतील मुलींसाठी आमगाव येथे कला सत्राचे आयोजन,
विद्यार्थिनींना शिक्षणासोबत त्यांच्या आवडत्या कला जोपासता याव्या व त्यांच्यातील कला गुणांना वाव मिळावा,यासाठी उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनचा हा उपक्रम आहे.गेल्या वर्षभरात विविध शाळेत जाऊन असे कार्यक्रम पार पडले.
वाडा तालुक्यातील आमगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत कला सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
उकर्ष ग्लोबल फाउंडेशनच्या महिला शिक्षण आणि सक्षमीकरण मोहिमेद्वारे आकर्षक बोव्ज् आणि मनमोहक फुलपाखरू एक दिवसीय कार्यशाळा राबविण्यात आली.या कार्यशाळेत ११ ते १६ वयोगटातील ८० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. कार्यशाळेसाठी उपमुख्याध्यापक गणेश किंगे, मृणाली नडगे,विकास कांबळे, आणि सुवर्णा मेने यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.

