संजय लांडगे,वाडा शहर,
स्व.विष्णू सवरा यांच्या स्मृतिदिनानिमित्त रुग्णांना फळवाटप,
महाराष्ट्र राज्याचे माझी आदिवासी विकासमंत्री स्व. विष्णू सवरा यांच्या चौथ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त वाडा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
भाजप वाडा तालुका अध्यक्ष मंगेश पाटील यांच्यातर्फे रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी बोलतांना पाटील म्हणाले की,सवरा यांनी फक्त वाड्यासाठीच नाही,तर पालकमंत्री म्हणून जिल्ह्यासह महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेसाठी मोलाचे योगदान दिले आहे.त्यांचे कार्य अविस्मरणीय असे होते.त्यांच्या अकाली निधनाने पालघर जिल्ह्याची मोठी हानी झाली आहे.
आज त्यांच्या स्मृती दिनानिमित्त वाडा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन युवा मोर्चाचे पालघर जिल्ह्याध्यक्ष कुणाला साळवी यांनी केले होते.
याप्रसंगी भाजपाचे पदाधिकारी रोहन पाटील, कुणाल साळवी,राजेश रिकामे, कांतीकुमार गोरे,निशांत वलटे, हर्षद जाधव,भाई वाडेकर, तेजस पाटील,अमित शिर्के, भीमराव बागुल व कार्यकर्ते उपस्थित होते.

