दीपक मोहिते,
विरार येथे महिलांसाठी कार्यशाळा संपन्न,
यंग स्टार ट्रस्टचे अध्यक्ष लोकनेते माजी आ.हितेंद्र ठाकूर यांच्यातर्फे खास महिलांसाठी व्यवसाय विषयक उपक्रम अंतर्गत विनामूल्य अत्तर,अगरबत्ती,फिनाईल बनवण्याचे प्रशिक्षण आज साईबाबा मंदिर हॉल कारगिल नगर मनवेलपाडा विरार पूर्व येथे आयोजित करण्यात आले होते.
या कार्यशाळेस स्थायी समितीचे माजी सभापती प्रशांत राऊत,माजी नगरसेविका मीनल पाटील, संगीता भेरे,यंग स्टार ट्रस्टच्या रुचिता नाईक,मिलिंद पोंक्षे, भूषण चूरी,बहुजन विकास आघाडी कार्यकर्ता मनीष राऊत,बहुजन विकास आघाडी कार्यकर्ते,महिला कार्यकर्त्या,मनवेल पाडा विभागातील महिला वर्ग उपस्थित होता.
सदर कार्यशाळेस उपस्थित महिलाना रुचिता नाईक यांनी अत्तर,अगरबत्ती,फिनाईल बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवले व याविषयी सखोल मार्गदर्शन केले.सदर कार्यशाळा संघटक सचिव व ट्रस्टचे समन्वयक अजिव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

