दीपक मोहिते,
त्या ४१ अनधिकृत इमारतीवर आजपासून निष्कासनाची कारवाई,
वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रभाग समिती ‘ डी,’ मौजे आचोळे सर्वे नं.२२ ते ३२ व ८३ मधील “डंपिग ग्राऊंड व मलजल प्रक्रिया केंद्र ( एसटीपी, )” साठी आरक्षित असलेल्या आरक्षित भुखंडावर सन २०१० पूर्वी तत्कालिन सिडको नियोजन प्राधिकरणाच्या कार्यकाळात बांधलेल्या ४१ अनधिकृत इमारतीविरोधात उच्च न्यायालयात रिट याचिका क्र.१५८५३/२०२२ दाखल करण्यात आली होती.
उच्च न्यायालय,मुंबई व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून या ४१ इमारतीवर आजपासुन निष्कासनाची कारवाई करण्यात येणार आहे.तरी सदर इमारती लवकरात लवकर खाली करुन वसई विरार शहर महानगरपालिकेला सहकार्य करावे,असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
जे सदनिकाधारक विहित पुरावा सादर करतील,त्यांना वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
तरी संबंधित इमारतीमधील रहिवाशांना वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे आवाहन करण्यात आले आहे की,आपल्या सदनिका तात्काळ रिकाम्या करण्यात येऊन वसई विरार शहर महानगरपालिकेस सहकार्य करावे आणि त्याचे प्रमाणपत्र मिळणेकामी सर्व संबंधित कागदपत्रासह वसई विरार शहर महानगरपालिकेचे प्रभाग समिती ‘डी’ कार्यक्षेत्रातील सहा.आयुक्त यांच्याशी तसेच क्षेत्रीय उपायुक्त यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

