दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
पालघर विधानसभा ; महायुतीचे राजेंद्र गावित सध्या अडचणीत आले आहेत,
पालघर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांना मुरबे गावात प्रचार करताना मच्छीमार समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले.या गावात स्थानिक गावकऱ्यांनी त्यांचा काळे झेंडे दाखवून निषेध केला.राजेंद्र गावित यांचे ज्या जिंदाल उद्योग समूहाशी घनिष्ट संबंध आहेत,त्या समूहाला या गावात बंदर उभारणीसाठी गावित यांनी मदत केली,असा आरोप मच्छीमार समाजाकडून करण्यात येत आहेत.
वाढवण बंदर प्रकल्प उभारणी बाबतही याच गावित यांची भूमिका संशयास्पद होती. त्यावेळी खासदार असलेल्या राजेंद्र गावित हे या बंदरासंदर्भात तोंडातून चकार शब्द काढत नसत.त्यामुळे त्यांच्यावर मांगेला व माच्छी समाजामध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे.ही नाराजी त्यांना प्रचारादरम्यान पाहायला मिळत आहे.मुरबे गावातील ग्रामस्थांनी त्यांना काळे झेंडे दाखवले व ” चले जाव,” घोषणा दिल्या.तसेच खासदार म्हणून काम करताना जिल्ह्याच्या विकासाच्या अनेक प्रश्नाविषयी गावित यांनी कायम अनास्था दाखवली.गेल्या तीन वर्षात अवकाळी व परतीच्या पावसाने कृषिक्षेत्राला चांगलाच फटका दिला होता.त्यामुळे जिल्ह्यातील भातशेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले.त्यांच्या नुकसानीचे पंचनामे करणे,त्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळवून देणे,राज्यसरकार तर्फे नुकसानभरपाई मिळवून देणे, इ.महत्वाच्या प्रश्नाकडे त्यांनी सातत्याने दूर्लक्ष केले.त्याचा राग मच्छीमार व शेतकरी या निवडणुकीत काढतील,असा अंदाज सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे.त्यामुळे राजेंद्र गावित हे सध्या अडचणीत आले आहेत.

