दीपक मोहिते,
निवडणूक पर्व,
बोईसर मतदारसंघात बविआचे कार्यकर्ते कामाला लागले..
बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची पहिली बैठक आज देवभूमी सफाळे येथे पार पडली.श्री गणरायाच्या व संविधानाच्या प्रतिमेसमोर नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
या बैठकीला आ.राजेश पाटील यांच्यासह राजीव पाटील,प्रविण राऊत,सुरेश तरे,तालुका अध्यक्ष,प्रमुख पदाधिकारी,सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी राजीव पाटील व प्रविण दादा यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.तसेच आपली शिटी निशाणी पळवण्याचा प्रयत्न करणा-यांना न्यायालयाने चांगलीच चपराक दिली व आपल्या अथक प्रयत्नानंतर शिटी निशाणी आपल्याला मिळाली,हा आपला विजय असल्याचे या दोघांनी सांगितले.
गेल्या निवडणुकीत जेव्हा राजेश पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली तेव्हा तो बोईसर मतदारसंघासाठी ते नवीन होते.मात्र निवडून आल्यावर सतत पाच वर्षे,विशेषकरून कोव्हिड सारख्या जागतिक महामारीच्या काळात सुध्दा जनतेत जाऊन त्यांनी कामे केली.त्यांना जेवण पोहचवणे,हॉस्पिटलमध्ये बेड तसेच रेमेडिसिव्हिअर, ऑक्सिजन उपलब्ध करून देत त्यांनी लोकांची काळजी घेतली.कोविड काळात मतदारक्षेत्रात निधी उपलब्ध होत नव्हता.मात्र पुढील तीन वर्षांत वेगवेगळ्या योजनांतून जवळपास १४०० ते १५०० कोटींचा निधी मतदारक्षेत्रात आणला व प्रत्येक गाव पाड्यापर्यंत विकासकामे केली.जल जीवन मिशन,मत्स्य विभाग,कृषी विभाग,डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास निधी,ठक्कर बाप्पा अशा विविध योजनेतून तळागाळातील जनतेपर्यंत लाभ पोहोचवला.त्यांच्या या मेहनतीला कौल देत पक्षश्रेष्ठींनी त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली आहे.तेव्हा पुन्हा राजेश पाटील या कर्तव्य तत्पर आमदाराला भरघोस मतांनी निवडून द्या व आपल्या मतदारसंघातील विकासासाठी पालघर जिल्ह्यातील आपले स्थान बळकट करायचे आहे,अशी प्रतिज्ञा घेत कार्यकर्ते नवी ऊमेद घेऊन कामाला लागले आहेत.

