दीपक मोहिते,
निवडणूक पर्व,
माझा फोकस विकासकामांवर -आ.क्षितिज ठाकूर,
नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आ.क्षितिज ठाकूर हे कालपासून उसंत न घेता आपला मतदारसंघ पिंजून काढत आहेत.चौकाचौकात त्यांच्या लहानमोठ्या सभा घेण्यास सुरुवात होत आहेत.त्यांच्या या उपक्रमाला नालासोपारावासीयांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.गेल्या पाच वर्षात केलेल्या कामावर त्यांच्या प्रचाराचा भर आहे.शहरात झालेल्या जाहीर सभेत भाषण करताना ते म्हणाले,२००९,२०१४ व २०१९ या सलग तीन निवडणुकांमध्ये तुम्ही मला भरभरून प्रेम दिले.याही निवडणुकीत तसच प्रेम मला तुमच्याकडून मिळणार आहे,याची मला खात्री आहे.वाढत्या नागरीकरणामुळे विकासकामे करताना अनेक अडथळे येत असतात,पण मी माझ्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यावर मात करू शकलो.आपल्या शहराची लोकसंख्या सुमारे आठ लाखाच्या घरात पोहोचली आहे.वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येच्या या शहराला नागरी सुविधा देताना स्थानिक स्वराज्य संस्थांची दमछाक होत असते,पण आपण त्यातून मार्ग काढू शकलो.गेल्या सहा महिन्यांपासून आपण सुरू केलेल्या ” क्षितिज संवाद,” या उपक्रमातून हजारो नागरिकांच्या अडचणी व समस्या मार्गी लावू शकलो.केवळ विरोधासाठी विरोध करणे,हे आम्ही कधीही केले नाही.त्यामुळे आम्ही या उपप्रदेशाच्या सर्वांगीण विकासामध्ये भरीव योगदान देऊ शकलो.विरोधकांनी कायम चांगल्या कामामध्ये अडथळे आणण्याचे काम केले.अनेक विकासकाममध्ये त्यांची दुटप्पी भूमिका राहिली,पण त्यांच्या टिकेला आम्ही उत्तर देत बसलो नाही.आमचा फोकस हा कायम विकासकामे मार्गी लावण्यावर राहिला.मी चौथ्यांदा तुम्हाला मी सामोरा आलो आहे.मला खात्री आहे की यावेळीही तुम्ही मला प्रचंड मताधिक्य मिळवून द्याल.मी लवकरच दुसऱ्या व तिसऱ्या फेरीत पुन्हा भेटायला येईन.

