दिपक मोहिते,
निवडणूक पर्व,
आ.हितेंद्र ठाकूर यांचा प्रचार दणक्यात सुरू;विरोधी पक्षाच्या उमेदवारांची बत्ती गुल….
वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी काल चर्चमध्ये जाऊन फादरांची भेट घेतली व सामूहिक प्रार्थनेत सहभागी झाले.त्यानंतर त्यानी आपल्या प्रचारास रीतसर सुरुवात केली.आ.ठाकूर यांची ही कृती त्यांना दिलासा देणारी ठरली आहे.त्यांना प्रत्येक विधानसभा निवडणुकीत ख्रिस्ती समाजातून भरभरून मते मिळत असतात,यंदाही तशीच स्थिती राहणार आहे.या समाजाच्या अनेक विकासकामांबाबत आ.ठाकूर हे कायम प्रयत्नशील राहिले.या समाजाच्या अनेक तरुण उद्योजकांना विविध उद्योगात त्यांनी पुढे आणले.त्यामुळे त्यांच्या जवळच्या वर्तुळात अनेक ख्रिस्ती तरुण पाहायला मिळतात.तसेच मुस्लिम समाजातही त्यांना मानाचे स्थान आहे.सर्वधर्मसमभाव पाळत त्यांनी मुस्लिम समाजाचे अनेक जटील प्रश्न मार्गी लावले. शिक्षण,आरोग्य,वक्फ बोर्ड व मदरशा इ.क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली.ख्रिस्ती व मुस्लिम समाजातील आपल्या कार्यकर्त्यांना आ.ठाकूर यांनी उपमहापौरपदावर संधी दिली.मुस्लिम समाजातील एका तरुणाला महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापतीपद बहाल केले.प्रत्येक समाजाला त्यांनी सत्तेत मोलाचा वाटा मिळवून दिला.त्यामुळे ख्रिस्ती,मुस्लिम,सामवेदी,
मराठा,गुजराथी,केरळीय व अन्य समाजाकडून त्यांच्या पारड्यात भरभरून मते पडत असतात.कालपासून त्यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे.सदभावना व केलेल्या विकासकामांवर आ.हितेंद्र ठाकूर मतदारांना सामोरे जात आहे.काल त्यांनी आपल्या वसई मतदारसंघातील मतदारांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे.या भेटीत त्यांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता विरोधी पक्षाचे उमेदवार त्यांच्या आसपास पण फिरकू शकणार नाहीत,असे विरोधी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आतापासून खाजगीत बोलत असतात.

