दीपक मोहिते,
न्यूजलाईन,
आ.क्षितिज ठाकूर यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू,
१३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे युवा आ.क्षितिज ठाकूर यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू झाला असून काल त्यांनी प्रचाराच्या पहिल्याच दिवशी आपल्या प्रचाराचा धुरळा उडवून दिला.काल त्यांनी विरार पूर्व भागातील अनेक प्रभागात प्रचाराच्या मोहिमेस सुरुवात केली.यावेळी त्यांनी मतदारांची प्रत्यक्ष भेटी घेण्यावर भर दिला.त्यांच्या या उपक्रमाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
त्यांच्या प्रचारात महिला व तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.जागोजागी अनेक महिलांनी त्यांना ओवाळले व विजयाच्या शुभेच्छा दिला.यावेळी मतदारांशी संवाद साधताना आ.क्षितिज यांनी आपला फोकस केलेल्या विकासकामांवर ठेवला.तसेच सध्या जाणवणाऱ्या नागरी समस्यांचा आढावाही घेतला.ज्या काही समस्या प्रलंबित आहेत,त्या अल्पावधीत मार्गी लावू असे आश्वासन त्यांनी जागोजागी दिले.काही भागात त्यांनी घराघरात जाऊन ज्येष्ठ नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.” मतदारांशी थेट संवाद,” हे त्यांच्या प्रचाराचे सूत्र ठरवण्यात आले असून त्याला मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे.त्यामुळे विरोधकांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.आ. क्षितिज ठाकूर यांच्या झंझावातापुढे आपला टिकाव लागेल का ? अशा भितीच्या सावटाखाली आले आहेत.

