दीपक मोहिते,
” शिट्टी,” चिन्हाचा तिढा अखेर सुटला,
अखेर विरोधकांचा डाव उधळला गेला.बहुजन विकास आघाडीचे ” शिट्टी,” हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचे प्रयत्न असफल ठरले आहेत.आज मुंबई उच्च न्यायालयाच्या आरिफ एस.डॉक्टर व सोमशेखर सुंदर्शन यांच्या खंडपीठाने या प्रकरणी बहुजन विकास आघाडीच्या बाजूने निकाल दिला.
शिट्टी हे चिन्ह संयुक्त जनता दलाला बहाल करण्यात आल्यामुळे ते बहुजन विकास आघाडीला देता येणार नाही,असे केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला कळवण्यात आले होते.त्यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला होता.या प्रकरणी बहुजन विकास आघाडीने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती.आघाडीच्या या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे आरिफ एस.डॉक्टर व सोमशेखर सुंदर्शन यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली.यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाचे वकील शिंदे यांनी राज्यात ही निवडणूक संयुक्त जनता दल लढवत नसल्यामुळे हे चिन्ह बहुजन विकास आघाडीला देण्यास हरकत नाही,असे स्पष्ट केले.त्यामुळे चिन्हाचा तिढा काही मिनिटात सुटू शकला.यावेळी याचिकाकर्त्यांचे वकील राजेश दातार यांनी प्रक्रिया पूर्ण होण्यास फार कमी अवधी असल्यामुळे संबधित निवडणूक शाखेला त्वरीत आदेश देण्याची विनंती खंडपीठाला केली,ती आयोगाच्या वकिलांनी मान्य केली.यावेळी याचिकाकर्त्यातर्फे ऍड.राजेश दातार,ऍड.संतोष खळे,यश देवल,द्रुती दातार यांनी काम पाहिले.या निर्णयामुळे विरोधकांचे मनसुबे उधळले गेले.हे चिन्ह बविआला मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर विरोधकांचा आनंद गगनात मावत नव्हता.आज लागलेल्या या निकालामुळे बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

