दीपक मोहिते,
आ.हितेंद्र ठाकूर व आ.क्षितिज ठाकूर यांचे उमेदवारी अर्ज दाखल,
आज वसई,नालासोपारा व बोईसर या तीन विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार व त्यांच्या समर्थकांची प्रचंड गर्दी उसळली होती.वसई येथे आ.हितेंद्र ठाकूर,यांनी नालासोपारा येथे आ.क्षितिज ठाकूर व बोईसर येथे आ.राजेश पाटील यांनी मिरवणुकीने येऊन आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले.अर्ज दाखल करण्याचा उद्याचा शेवटचा दिवस असून उद्याही प्रचंड गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पालघर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघातील ८० % उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल केले आहेत.आज सकाळी साडेनऊ वाजता आ.हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांनी भव्य रॅली काढली.ढोलताशा,झेंडे,
पताके मिरवत रॅली तहसील कार्यालयावर आल्यानंतर आ.हितेंद्र ठाकूर यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला.यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी माजी महापौर प्रविणाताई ठाकूर,बविआचे ज्येष्ठ नेते बबनशेठ नाईक व अन्य पदाधिकारी.त्यानंतर दुपारी दीड वाजता नालासोपारा विधानसभेचे आ.क्षितिज ठाकूर यांची हजारो कार्यकर्त्यांनी बविआ भवन ते म्हाडा कॉलनी दरम्यान प्रचंड मिरवणूक काढली.या मिरवणुकीत हजारो बाईकस्वार व ४०० वाहनाचा ताफा सहभागी झाला होता.बेंजो,ढोलताशा,कच्चीबाजाने परिसर दुमदुमन गेला होता.त्यांच्या समवेत त्यांच्या मातोश्री प्रविणाताई ठाकूर,माजी खा.बळीराम जाधव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.इतर पक्षाच्या काही उमेदवारांनीही आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले.
तसेच काल दक्षता पथकाने वसई फाटा येथे एका वाहनातून ४ लाखाची रोकड जप्त केली आहे.या प्रकरणी अधिक माहिती मिळवण्याचा पत्रकारांनी प्रयत्न केला,पण माहिती मिळू शकली नाही.

