दीपक मोहिते,
निवडणूक पर्व,
पालघर व बोईसर शिंदे गटाकडे, नालासोपारा,डहाणू,वसई,विक्रमगड भाजपला,
पालघर लोकसभा मतदारसंघातील ६ विधानसभा मतदारसंघांपैकी ४ विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली असून या चार जागांपैकी २ जागा भाजपच्या वाट्याला आल्या आहेत.तसेच भाजपचे माजी खा.राजेंद्र गावित व माजी आ.विलास तरे या मूळच्या भाजपच्या नेत्यांना शिंदे गटातुन उमेदवारी देण्यात आली आहे.त्यामुळे शिंदे गटात प्रचंड नाराजी पसरली असून त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपच्या या उमेदवाराच्या प्रचारापासून दूर राहणार असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे.
भाजपने जागावाटपात एकनाथ शिंदे गटाच्या तोंडाला पाने पुसली आहेत.त्यांनी १३२ नालासोपारा-राजन नाईक,१३० पालघर-राजेंद्र गावित,१३१ बोईसर-विलास तरे ( सध्या या दोघांना शिंदे गटातून भाजपने उमेदवारी मिळवून दिली आहे.) १२९ विक्रमगड-हरिश्चंद्र भोये व नालासोपारा येथे राजन नाईक यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.भाजपने खेळलेल्या तिरक्या चालीमुळे शिंदे गटातील इच्छुक नाराज झाले आहेत.या चारही मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता आहे.बोईसर विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे जगदीश धोडी हे इच्छुक होते.निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी जय्यत तयारी केली होती.पण भाजपने केलेल्या सर्व्हेमध्ये बोईसर व पालघर मतदारसंघात त्यांची डाळ शिजणार नाही,असे कारण पुढे करत आपले गावित व तरे यांना शिंदे गटातून उमेदवारी मिळवून दिली.१२८ डहाणू हा विधानसभा मतदारसंघ देखील भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे.१३३ विधानसभा मतदारसंघावरही भाजपचा डोळा असून येथे श्रमजीवी संघटनेच्या नेत्या स्नेहा दुबे यांना उभे करण्याच्या प्रयत्नात भाजप आहे.या चार जागा भाजपच्या वाट्याला गेल्या आहेत तर शिंदे गटाला दोन जागा मिळल्या असल्या तरी शिंदे गटातून ज्यांना उमेदवारी मिळाली आहे,ते दोन्ही उमेदवार मूळचे भाजपचे आहेत.भाजपने पालघर जिल्ह्यात शिंदे गटाला दुय्यम वागणूक दिल्यामुळे शिंदे गटात प्रचंड नाराजी पसरली आहे.भाजपने या सहा विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचा पद्धतशीरपणे गेम केल्याचे स्पष्ट होत आहे.मात्र बोईसर,पालघर व नालासोपारा या तीन मतदारसंघात शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपच्या प्रचारापासून दूर राहण्याची शक्यता आहे.

