दीपक मोहिते,
नालासोपारा मतदारसंघात आ.क्षितिज ठाकूर यांच्या प्रचारासाठी तरुणांच्या झुंडीच्या झुंडी बाहेर पडणार,
उद्या नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आ.क्षितिज ठाकूर आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वाजत गाजत,ढोलताशाच्या गजरात विरार म्हाडा येथील कार्यालयात येणार आहेत.त्यासाठी विविध समाजातील तरुण एकवटले आहेत.उद्या निघणाऱ्या रॅलीसाठी तरुणांनी जय्यत तयारी चालवली आहे.
युवा आमदार क्षितिज ठाकूर हे चवथ्यादा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत.आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत या तरुण युवा आमदाराने गेल्या पंधरा वर्षात आपल्या मतदारसंघात अनेक विकासकामे मार्गी लावली.राज्यस्तरावरील विविध राजकीय पक्षातील ज्येष्ठ नेत्यांशी त्यांचे आपल्या वडीलासारखेच स्नेहाचे संबंध आहेत.त्या जोरावर त्यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी भरीव आर्थिक निधी आणला.मेट्रो,मुंबई-अहमदाबाद महामार्ग विस्तार,रो,रो सेवा,विजेच्या समस्या निराकरण,इ.विकासकामे त्यांनी केली.” क्षितिज संवाद,” या उपक्रमातून त्यांनी जनतेच्या समस्या सोडवल्या.नालासोपारा हे शहर लोकसंख्येच्या बाबतीत अत्यंत दाटीवाटीचे शहर म्हणून ओळखले जाते.गेल्या दहा वर्षात या शहराची लोकसंख्या आठ ते दहा लाखाच्या घरात पोहोचली आहे.त्याचा विकासावर परिणाम होत गेला.पण या उच्चविद्याविभूषित युवा आमदाराने हे धनुष्य जबाबदारीने पेलले व नागरिकांना दिलासा मिळवून दिला.२००९,२०१४ व २०१९ या तीन विधानसभा निवडणुकीत नालासोपरावासीयांनी त्यांच्या पारड्यात भरभरून मते टाकली.त्यांनी मतदारांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला नाही.२०१९ च्या निवडणुकीत त्यांनी दाखवून दिले,कि ” बाप तो बाप होता है,मगर बेटा भी सवाई होता है,” याही निवडणुकीत आ.क्षितिज ठाकूर प्रचंड मताधिक्य घेणार,यात तिळमात्र शंका नाही.” आम्ही जे बोलतो,ते करून दाखवतो व आजवर करून दाखवले,या टॅगलाईनवर त्यांचा प्रचार उद्यापासून सुरू होत आहे.उद्यापासून नालासोपारा मतदारसंघात त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे या निवडणुकीची लढाई जिंकण्यासाठी आता सज्ज झाले आहेत.

