पालघर,
पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात २२ लाख १९ हजार ३३ मतदार,
लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पालघर जिल्ह्यात सुमारे २२ लाख १९ हजार ३३ मतदार आपल्या हक्काचे ६ आमदार निवडणार आहेत.या एकूण मतदारांपैकी ११ लाख ५६ हजार ९९९ पुरुष तर १० लाख ६१ हजार ८०८ महिला मतदार असून इतर मतदारांची संख्या २२६ इतकी आहे.
पालघर लोकसभा मतदारसंघात १२८-डहाणू,१२९-विक्रमगड,१३०-पालघर,१३१-बोईसर,१३२-नालासोपारा व १३३- वसई,असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ आहेत.या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी १३१-नालासोपारा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ५ लाख ८२ हजार ९०२ मतदार आहेत.त्यापैकी पुरुष-३ लाख १५ हजार ८२९ तर २ लाख ६६ हजार ९५३ महिला मतदार आहेत.येथे इतर मतदारांची संख्या अधिक आहे.१२० इतर मतदार आहेत.सर्वात कमी मतदार १२८-डहाणू अनु.ज.येथे आहेत.येथे एकूण २ लाख ९० हजार ५३० मतदार आहेत,त्यापैकी १ लाख ४५ हजार १७५ पुरुष तर १ लाख ४५ हजार ३२२ महिला मतदार आहेत.या मतदारसंघात महिला मतदारांची संख्या पुरुषापेक्षा अधिक आहे.इतर मतदार केवळ ३३ इतकी आहे.१२९ विक्रमगड,अनु.ज.-एकूण मतदारसंख्या ३ लाख ७ हजार ७७४ इतकी आहे.त्यापैकी पुरुष-१ लाख ५४ हजार ७,तर महिला-१ लाख ५३ हजार ७६६ व इतर मतदार केवळ १ आहे.१३०-पालघर,अनु.ज.-२ लाख ९० हजार १६५ मतदार असून त्यापैकी १ लाख ४५ हजार ६४० पुरुष तर १ लाख ४४ हजार ५९४ महिला मतदार आहेत,येथे इतर मतदारांची संख्या आहे केवळ २१,१३१- बोईसर,अनु.ज.-एकूण मतदारसंख्या आहे ३ लाख ९८ हजार ८०७,त्यामध्ये पुरुष मतदार आहेत २ लाख १६ हजार ८५६ तर महिला १ लाख ८१ हजार ९१० येथे इतर- ४१ मतदार आहेत.१३२-वसई,सर्वसाधारण – एकूण मतदार आहेत ३ लाख ४८ हजार ७६५,त्यापैकी पुरुष मतदार आहेत १ लाख ७९ हजार ४९२,तर महिला आहेत १ लाख ६९ हजार २६३ व इतर मतदार आहेत फक्त १०,

