दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
“भगव्याने गुलाबी रंग झाकण्यासाठी घेतला काळ्या रंगाचा आधार,
बारामतीमध्ये घडलेल्या एका घटनेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.घटना होती,कार्यक्रमाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या कमानीवर असलेला अजित पवार यांचा फोटो काळ्या पडद्याने झाकुन टाकला.या घटनेने अजित पवार गटाचे तमाम नेते व प्रवक्त्यांचे पित्त चांगलेच खवळले व ते सारे कार्यक्रमाच्या या आयोजकांवर तुटून पडले.बारामतीसारख्या मतदारसंघात असं घडावं,हे अजित पवार यांना त्रासदायक ठरणारे आहे.दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे गटाने बारामती येथे एक कार्यक्रम आयोजित केला होता.या कार्यक्रमाचे आमंत्रण अजित पवार यांना देण्यात आले होते.तसेच त्यांनी कार्यक्रमास यावे,यासाठी आयोजकांनी त्यांना वेळोवेळी विनंत्या केल्या,तसेच मोबाईलवरून कॉल देखील केले,पण अजित पवार हे काही कार्यक्रमास उपस्थित राहिले नाहीत.बारामती मतदारसंघात झालेला पराभव त्यांच्या जिव्हारी लागला असून त्यांच्या मस्तकात असलेला संताप अद्याप ओसरलेला नाही.त्यामुळे ते एकनाथ शिंदे गटाच्या नेत्याच्या या कार्यक्रमाच्या ठिकाणी फिरकले नाहीत.अजित पवार यांच्या अशा Electrician भडकलेल्या एकनाथ शिंदे गटाच्या त्या नेत्याने कार्यक्रमाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या कमानीवर असलेला अजित पवार यांचा फोटो काळ्या कपड्याने झाकून टाकला.त्याची व्हिडियो क्लिप व्हायरल झाल्यावर सर्वत्र गदारोळ उठला.या त्यांच्या गटाच्या अनेक नेत्यानी या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली.या घटनेमुळे बारामतीमध्ये काल दिवसभर चर्चा होत होती.” भगव्याने गुलाबी रंग झाकण्यासाठी काळ्या रंगाचा आधार घेतला,”अशी.

