दीपक मोहिते,
राजकारणातील सभ्य व्यक्तिमत्व ; आर.आर.पाटील,
काल आर.आर.उर्फ आबा पाटील यांची जयंती होती.पण यानिमित्ताने राज्यात कुठेही कार्यक्रम झाल्याचे कानावर आले नाही.राजकारणातील एक सभ्य व अजातशत्रू म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या आबांचा राजकीय मंडळींना विसर पडावा,यासारखे दुसरे दुर्देव नसावे.
सांगली जिल्ह्यातील अंजनी,तासगाव येथे १६ ऑगस्ट १९५७ रोजी जन्माला आलेल्या आबांनी तरुणपणी राजकारणात प्रवेश केला व अल्पावधीत यशाची एकेक शिखरे सर केली.ते लोकांमध्ये स्वच्छ चारित्र्याचे व प्रामाणिक नेते म्हणून प्रसिद्ध होते.१९९० साली तासगाव-कवठेमहांकाळ मधून ते विधानसभेवर निवडून गेले.त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून बघितले नाही.शरद पवार यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख होती.महत्वाच्या प्रश्नावर शरद पवार हे त्यांच्याशी कायम सल्लामसलत करत असत.उपमुख्यमंत्री,गृहमंत्रीम्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले.२६ नोव्हे.रोजी मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर झालेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात प्रचंड गदारोळ उडाला होता.विरोधकांनी त्यांना टीकेचे लक्ष्य केले होते.त्यामुळे त्यांना
मंत्रपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.पवार यांच्याशी जवळीक असूनही त्यांना पक्षांतर्गत विरोधाला सतत तोंड द्यावे लागत होते.त्यानंतर त्यांना दुर्धर आजाराने ग्रासले होते,त्यातून ते बाहेर पडू शकले नाहीत.१६ फेब्रु.२०१५ मध्ये त्यांनी. मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.पत्नीनंतर. त्यांचा वारसा आता मुलगा रोहीत पवार यांच्याकडे आला असून रोहितदेखील वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात वावरू लागला आहे.वडिलांची पुण्याई व अंगभूत गुणांच्या बळावर रोहित देखील आपल्या वडीलासारखाच काम करत आहे.अशा समाजधुरिणाच्या जयंतीचा त्यांच्या सहकाऱ्यांना विसर पडावा,यासारखे दुसरे दुसरे दुर्देव नसावे.

