दीपक मोहिते,
सुप्रसिद्ध साहित्यिक फा.दिब्रिटो कालवश,
प्रसिद्ध साहित्यिक,लेखक फा.फ्रान्सिस दिब्रिटो यांचे आज सकाळी निधन झाले.मृत्यूसमयी ते ८२ वर्षाचे होते.
४ डिसें.१९४२ रोजी विरार पश्चिमेस नंदखाल या गावात त्यांचा जन्म झाला होता.त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातील सेंट जोसेफ मराठी हायस्कुल मध्ये झाले.१९७२ साली त्यांनी कॅथॉलिक धर्मगुरूपदाची दीक्षा घेतली.त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून समाजशास्त्रात बी.ए.तर धर्मशास्त्रात एम.ए. केले.पुढील काळात त्यांनी विपुल लिखाण केले.आनंदाचे अंतरंग,ओअँसिसच्या शोधात,ख्रिस्ताची गोष्ट,ख्रिस्ती सण आणि उत्सव,तेजाची पावले,नाही मी एकला,संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची : इस्त्रायल व परिसराचा संघर्षमय इतिहास,सुबोध बायबल,न्यु टेस्टमेंट,सृजनाचा मळा, सृजनाचा मोहोर,मुलांचे बायबल,इ.चा त्यामध्ये समावेश आहे.तसेच त्यांचे वसईच्या अनेक आंदोलने व चळवळीत मोठे योगदान होते.हरित वसई चळवळीच्या माध्यमातून त्यांनी प्रचंड आंदोलन उभे केले होते.२०१३ साली त्यांना साहित्य अकादमीचा मानाचा पुरस्कार देण्यात आला.तसेच केंद्रसरकारने त्याचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला होता.

