दीपक मोहिते
दिल्ली बॉम्बस्फ़ोट प्रकरणी चार जण तपास यंत्रणाच्या ताब्यात,
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात एका हॉस्पिटलमधील चार डॉक्टर्सची नाव समोर आली आहेत.हा हल्ला आत्मघातकी दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. याप्रकरणी सुरु असलेल्या तपासाला वेग आला आहे. त्यातून अनेक धक्कादायक खुलासे होऊ लागले आहेत.
दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ काल संध्याकाळी शक्तीशाली स्फोट झाला होता. या स्फोटाने राजधानीचे शहर असलेली दिल्ली हादरली.संध्याकाळी ६.५२ मिनिटांनी हा शक्तीशाली स्फोट झाला होता.यास्फ़ोटामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला तर २०जण जखमी झाले आहेत.स्फोट इतका शक्तीशाली होता की,आसपासचा परिसर प्रचंड हादरला.परिसरात एकच गडबड,गोंधळाची स्थिती होती.आय-२० कारमध्ये हा स्फोट झाल्याचं तपासातून समोर आले आहे.घटनेच्या ३ तास अगोदर ही कार सुनहरी मशिदीजवळ उभी होती. स्फोटानंतर तपास करणाऱ्या दिल्ली स्पेशल सेलच्या हाती काही महत्वाचे पुरावे लागले आहेत.त्यावरुन हा स्फोट आत्मघातकी दहशतवादी हल्ला असल्याचे संकेत मिळत आहेत.
स्फोटाच्या आधी काल सकाळी जम्मू-काश्मीर आणि फरीदाबाद पोलिसांनी एक जॉइंट ऑपरेशन केलं.त्यांनी दोन वेगवेगळ्या घरातून २ हजार ९०० की.आयइडी बनवणारे केमिकल्स,शस्त्र आणि दारु गोळा जप्त केला होता.जैश-ए-मोहम्मद ( जेएएम ) आणि अंसर गजवात-उल-हिंद ( आगुह ) यांच्याशी संबंधित आंतरराज्यीय दहशतवादी नेटवर्कचा पदार्फाश करताना ही सामग्री हाताला लागली.ही कारवाई आणि स्फोटाची वेळ याचा परस्परांशी किती संबंध आहे,त्यादृष्टीने तपास यंत्रणाचा तपास सुरु आहे.या दहशतवादी हल्ल्याचे डॉक्टर कनेक्शन समोर येतय.
दिल्लीत स्फोट होण्याआधी काही घटना घडल्या. अनंतनागमध्ये जम्मू-काश्मीर पोलिसांनी डॉ.आदिल अहमद राठरला अटक केली.तो अनंतनाग मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर आहे. त्याच्या लॉकरमध्ये पोलिसांना एके ४७ रायफल सापडली. राठरचा संबंध जैश-ए-मोहम्मद आणि अंसार गजवात-उल-हिंदशी आहे.
दुसरी अटक ७ नोव्हें.रोजी हरियाणाच्या फरीदाबादमध्ये झाली.अल-फलाह यूनिवर्सिटीमध्ये कार्यरत असलेली लखनऊची एक महिला डॉक्टर शाहीन शाहिदच्या कारमध्ये ” कॅरोम कॉक,” नावाची असॉल्ट रायफल सापडली.तिचा या नेटवर्कमध्ये काय रोल आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत. सध्या तिची ओळख पोलिसांनी सार्वजनिक केलेली नाही.
७ नोव्हें.रोजी गुजरात एटीएसने अहमद मोहिऊद्दीन सैयद नावाच्या डॉक्टरला पकडलं.हा डॉक्टर हैदराबादचा राहणारा आहे. चीनमध्ये त्याने शिक्षण घेतलय.चौकशीत समोर आलय की,रिसिन नावाचं एक खतरनाक विष तो बनवत होता.त्याने दिल्ली आजादपुर मंडी,अहमदाबादचं नरोडा फ्रूट मार्केट आणि लखनऊच्या आरएसएस कार्यालयसारख्या गर्दीच्या ठिकाणांची रेकी केली होती.
या ऑपरेशनमध्ये चौथी अटक १० नोव्हें.रोजी फरीदाबादमध्ये झाली.डॉ.मुझमिल शकील नावाच्या काश्मिरी डॉक्टरला अटक झाली.तो अल-फलाह यूनिवर्सिटीमध्ये शिकवत होता.त्याच्याकडे ३६० किलो अमोनियम नायट्रेट सापडलं. बॉम्ब बनवण्यासाठी त्याचा वापर होतो.मुझमिलच्या दुसऱ्या ठिकाणावर छापा मारला,तेथे २ हजार ५६३ किलो स्फोटकं सापडली. शकीलचा संबंध जैश सारख्या प्रतिबंधित संघटनेशी आहे असं फरीदाबाद पोलिसांनी सांगितलं.
दिल्लीच्या लालकिल्ला परिसरात हा स्फ़ोट घडवून आणण्यात दहशतवादी यशस्वी ठरले असुन,दिल्ली पोलीसांची ही अकार्यक्षमता असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्फ़ोट झाल्यानंतर आपल्या तपास यंत्रणा अलर्ट मोडवर येत असतात.एकंदरीत ज्या पद्धतीने हा स्फ़ोट घडवून आणण्यात आला त्यावरून तो नियोजित कट असल्याचे स्पष्ट होत आहे.राजधानी असलेल्या शहरात दहशतवादी जर अशा कारवाया करत असतील तर ते पोलीस व गुप्तचर यंत्रणाचे अपयशच म्हणावे लागेल.

