दीपक मोहिते,
” निवडणूक संग्राम, ”
पालघर जिल्ह्यातील तीन नगरपरिषदा व एक नगरपंचायतीची निवडणूक होणार…
काल राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यकम जाहीर केला.यामध्ये पालघर जिल्ह्यातील पालघर,डहाणू व जव्हार या नगरपरिषदा तसेच वाडा या नगरपंचायतीचा समावेश आहे.नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी २ डिसें. रोजी मतदान होणार असून लगेच दुसऱ्या दिवशी ३ डिसें. रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.त्यामुळे निवडणूक क्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू झाली आहे.

जिल्ह्यातील वाडा नगरपंचायतीमध्ये गेल्या निवडणुकीत एकूण १७ जागा होत्या.नगराध्यक्षपदी शिवसेना ठाकरे गटाच्या गीतांजली कोलेकर विराजमान झाल्या होत्या.एकूण १७ जागांपैकी शिवसेना ठाकरे गटाचे ४ नगरसेवक,भाजपा-६ शिवसेना शिंदे गट २,काँग्रेस २,राष्ट्रवादी १,बहुजन विकास आघाडी १,आरपीआय १ असे उमेदवार निवडून आले होते.

डहाणू नगरपरिषदेवर भाजपाची सत्ता असून नगराध्यक्षपदी भरत राजपूत हे थेट नगराध्यक्षपदी विराजमान झाले होते.या नगरपरिषदेत एकूण २५ जागा असून भाजपा १५,शिवसेना २, राष्ट्रवादी ८,असे बलाबल निर्माण झाले होते.

जव्हार नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्षपदी शिवसेनेचे चंद्रकांत पटेल हे निवडून आले होते.एकूण १६ जागांपैकी शिवसेना ८,राष्ट्रवादी ६, भाजपा १ व अपक्ष १,असे एकूण बलाबल होते.
दी

