दीपक मोहिते,
” खबरदारी,”
इच्छुक उमेदवारांनो अर्ज दाखल करताना अशी काळजी घ्या…
स्थानिक स्वराज्य स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे सध्या बिगुल वाजले असून राजकीय पक्षाच्या हालचालींना चांगलाच वेग आला आहे.प्रत्येक राजकीय पक्षात इच्छुकांची भाऊगर्दी झालेली पाहायला मिळत आहे.युती व आघाडी करण्यासंदर्भात प्रमुख राजकीय पक्षांनी अद्याप आपले पत्ते खोललेले नाहीत.पण आपापल्या प्रभागात निवडणुकीचे चित्र कसे असेल,याविषयीची धाकधूक प्रत्येक इच्छुक उमेदवारांच्या मनात सुरू झाली आहे.आपल्याला उमेदवारी मिळाल्यास आवश्यक ती कागदपत्रे तयार असावीत,यासाठी अनेक इच्छुक सध्या विविध कामामध्ये गर्क आहेत.अनेकदा अर्धवट माहिती,अपुरी कागदपत्रे आदी कारणांमुळे आजवर अनेकांवर आपली उमेदवारी गमावण्याची पाळी आली आहे.तशी ती आपल्यावर येऊ नये,यासाठी इच्छुक उमेदवाराने दक्षता घेण्याची गरज आहे.त्यासाठी खालील निवडणूक २०२५,च्या महत्वाच्या बाबीवर एक नजर टाकण्याची गरज आहे.
निवडणूक लढवण्यासाठी खालील बाबीची पूर्तता करणे, अनिवार्य आहे.
१ ) अर्जदाराचे दोन पासपोर्ट फोटो, ( नुकतेच काढलेले )
२ ) अर्जदाराचे निवडणूक ओळखपत्र,
३ ) अर्जदाराचे आधार कार्ड,पॅनकार्ड ड्रायव्हिंग लायसन्स,शाळा सोडल्याचा दाखला,जन्म प्रमाणपत्र,
४ ) निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर अर्जदाराचे राष्ट्रीकृत बँकेत काढलेले खात्याचे पासबुक,
५ ) मतदारयादीतील अर्जदार व सूचक यांच्या नावाची प्रत व त्यांची ओळखपत्रे,
६ ) जातप्रमाणपत्र,वैधता प्रमाणपत्र,वैधता प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या प्रस्तावाची पावती,
७ ) अर्जदाराच्या अपत्याची संख्या व जन्मतारीख,
८ ) अर्जदार,अर्जदाराची पत्नी व त्यांच्या मुलांच्या नावावर असलेल्या वाहनांसंदर्भातील तपशील,किंमत,बनावट व सध्याचे बाजारमूल्य,
९ ) अर्जदार,अर्जदाराची पत्नी व त्यांची मुले यांच्या नावावर असलेली मिळकत,घर,प्लॉट,शेती व इतर संबधित तपशील सर्व्हे क्र,गट क्र.व सध्याचे बाजार मूल्य,
१० ) अर्जदार,अर्जदाराची पत्नी व त्यांची मुले यांच्या नावावर असलेल्या सोने चांदी व इतर दागिन्याची माहिती व सध्याचे बाजारमूल्य,
११ ) अर्जदार,अर्जदाराची पत्नी व त्यांच्या मुलांच्या नावावर असलेले बँकेचे शेअर्स,भाग व संचालक असल्यास त्याचा तपशील,
१२ ) शासकीय निवासस्थान असल्यास त्याचा कालावधी व थकबाकीबाबत माहिती,( ना हरकत दाखला )
१३ ) यापूर्वी लढवलेल्या निवडणुकीचा तपशील,खर्च,त्यामधील मिळकतीचे मूल्यांकन व दाखवलेला खर्च,
१४ ) अर्जदार,अर्जदाराची पत्नी व त्यांची मुले यांच्या नावावर असलेल्या एलआयसी पॉलिसी व इतर गुंतवणुकीचा तपशील,
१५ ) अर्जदार,अर्जदाराची पत्नी व त्यांच्या मुलांच्या नावावर असलेल्या शासकीय,निमशासकीय,खाजगी व इतर कर्जाची माहिती,
१६ ) अर्जदाराच्या नावात बदल असल्यास त्याबाबतचे शपथपत्र,
१७ ) अर्जदाराच्या नांवे आयकर भरणा केलेल्या तीन वर्षांचा तपशील,
१८ ) अर्जदाराच्या विरुद्ध प्रलंबित असलेल्या गुन्ह्याचा तपशील,गुन्हा क्रमांक,कलम,पोलीस ठाणे,सद्यस्थिती न्यायालय,
१९ ) अर्जदाराला दोन वर्षापेक्षा शिक्षा झाली असल्यास न्यायनिवाड्याची प्रत व केलेल्या अपिलाचा तपशील,
२० ) मान्यताप्राप्त राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवत असल्यास एबी फॉर्मची प्रत,
२१ ) शैक्षणिक माहिती,ज्यामध्ये शेवटी शिकलेल्या शाळा,महाविद्यालय व टीसीची प्रत,
२२ ) ईमेल आयडी,फेसबुक आयडी,ट्विटर,इंस्टाग्राम व मोबाईल क्रमांक,
२३ ) माजी नगरसेवक असल्यास ना हरकत प्रमाणपत्र,
२४ ) शौचालय असल्याबाबत प्रमाणपत्र,
२५ ) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र,

