वसंत भोईर,वाडा
अंभई ग्रामस्थांचे तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण,
आपल्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाडा तालुक्यातील अंभई गावच्या ग्रामस्थांनी काल पासुन तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
अंभई या गावाच्या हद्दीत असलेल्या झीको इंडिया या कंपनीत स्थानिक कामगारांना डावलण्यात येत असून स्थानिकांना या कंपनीत प्राधान्य देण्यात यावे,अंभई ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचारात चुकीचा अहवाल देणा-या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी,तसेच आमगाव येथे ग्रामस्थांची फसवणूक करून तयार करण्यात आलेले रस्ते खोदून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.विनापरवाना रस्ते खोदणा-या कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी,या सर्व मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नरेश पाटील, मनोज गोवारी,गोंविदा कातारे व विलास बरड या चार ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयासमोर काल पासुन बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
न्याय मिळेपर्यंत बेमुदत उपोषण सुरूच राहील,असा निर्धार उपोषण कर्त्यांनी केला आहे.

