दीपक मोहिते
पर्यटनवाढीला चालना,
वर्षानुवर्षे रखडलेली सर्व विकासकामे
देवाभाऊच्या नेतृत्वाखाली मार्गी लागतील – आ.स्नेहा दुबे पंडित,
राज्याच्या पर्यटनवाढीला चालना मिळावी,यासाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत वसई विभागासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ कोटी रु.चा निधी नुकताच मंजूर केला आहे.या प्रकरणी वसईच्या आ.स्नेहा दुबे पंडित यांनी गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता.
आ.स्नेहा दुबे पंडित यांनी गेल्या आठ महिन्यात वसई विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यात यश मिळवले.गेल्याच आठवड्यात त्यांनी वर्षानुवर्षे रखडलेले पाच उड्डाणपूले व रिंगरूटचा प्रश्न सोडवला.याकामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुक्तहस्ते निधी देऊ केला आहे.त्यानंतर दोनच दिवसापूर्वी वसई विधानसभा क्षेत्रातील विविध प्रभागातील मूलभूत सुविधा पर्यटन विकासाला चालना मिळावी,यासाठी २ कोटी रु.चा निधी मंजूर केला.त्यामुळे वसई तालुक्यातील पर्यटनाला नवीन आयाम मिळणार आहे.यासंदर्भांत बोलताना आ.स्नेहा दुबे पंडित म्हणाल्या,वसई तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे महायुती सरकार कटिबद्ध असून आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुशल मार्गदर्शन व धडाडी आमच्यासाठी प्रेरणादायी ठरली आहे.येत्या चार वर्षात वसई तालुक्यातील वर्षांनुवर्षं रखडलेली विकासकामे आता नक्कीच मार्गी लागतील,अशी मला खात्री वाटते.

