दीपक मोहिते,
वसईच्या विकासासाठी आ.स्नेहा दुबे पंडित यांचा जोरदार पाठपुरावा,
वसई तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आ.स्नेहा दुबे पंडित यांच्या पुढाकारातून महत्त्वपूर्ण रस्ते,उड्डाणपूल व रेल्वे ओव्हर ब्रिज संदर्भातील विकास कामांचा वेग वाढवण्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालयात एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसोबत नुकतीच बैठक पार पडली.
बैठकीत खालील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय झाला :
बाफाने फाटा–उमेळा फाटा,वसई फाटा–वसई गाव, सातिवली फाटा–रेंज ऑफिस,तिवरी फाटा – वामन ढाबा,तसेच,गोखिवारा रेंज ऑफिस,एव्हरशाई – वसंत नगरी व माणिकपूर नाका येथील उड्डाणपुलांचे डिझाईन व अलाइनमेंट निश्चित करण्याबाबत चर्चा झाली.ही तिन्ही कामे आठवड्याभरात प्रस्तावित होणार आहेत.
याशिवाय,उमेळमान–नायगावसह चार महत्त्वाच्या रेल्वे ओव्हर ब्रिजच्या कामांचा समावेश शासनाकडे पाठवण्यात येणार आहे.
या बैठकीमुळे वसईतील पायाभूत सुविधांना गती मिळून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे आ.स्नेहा दुबे पंडित यांनी सांगितले.
बैठकीस एमएमआरडीएचे मुख्य अभियंता प्रकाश भामरे, कार्यकारी अभियंता शेवाळे,महानगरपालिकेचे शहर अभियंता प्रदीप पाचंगे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे संजय यादव व कुलकर्णी उपस्थित होते.

