दीपक मोहिते,
शिंदे गट सक्रिय,
मनोर / पालघर येथे शिंदे गटाची संघटनात्मक बैठक संपन्न,
पालघर जिल्ह्यातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची “ संघटनात्मक बैठक,” काल उद्योगमंत्री उदय सामंत, पालघर जिल्हा संपर्कमंत्री तथा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक व हमी, फलोत्पादन,खारभूमी विकासमंत्री भरत गोगावले व पालघर जिल्हासंपर्क प्रमुख शिवसेना उपनेते रविंद्र फाटक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून संघटनात्मक घडामोडींवर सखोल चर्चा करण्यात आली.तसेच,पक्षाची आगामी राजकीय दिशा,पक्ष संघटनेची नव्याने रचना, प्रभावी जनसंपर्क आणि संवाद,प्रत्येक कार्यकर्त्याची भूमिका अधिक सक्रिय कशी राहील,विकास आणि जनसेवा या प्रमुख मुद्द्यांसह आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रमुखांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
कार्यकर्त्यांच्या सूचना,अनुभव आणि इच्छाशक्ती,यांमुळे ही बैठक अत्यंत फलदायी ठरल्याचे ज्येष्ठ नेत्यांनी माध्यमाना सांगितले.संघटन ही आपल्या कामाची खरी ताकद आहे आणि ही ताकद अधिक मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी एकसंघ राहण्याचा प्रयत्न केले पाहिजे,असे प्रत्येक नेत्याने आपल्या भाषणात सांगितले.
यावेळी,आ.राजेंद्र गावित साहेब,आ.विलास तरे,जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण,जिल्हाप्रमुख कुंदन संख्ये,उपनेत्या ज्योती मेहेर, राजेश शहा,प्रवक्ते व सहसंपर्क प्रमुख केदार काळे,जिल्हा संघटिका वैदेही वाढाण,जिल्हा संघटिका वैष्णवी राहणे, जिल्हा संघटिका लक्ष्मी चांदणे,माजी आ.मनीषा निमकर,माजी आ.श्रीनिवास वनगा,माजी आ.अमित घोडा, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा भारती कामडी,माजी नगराध्यक्ष उत्तम घरत व इतर प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते, युवक-युवती तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

