वाडा प्रतिनिधी,
शून्य प्लास्टिक मोहिमेमध्ये शिक्षक व विद्यार्थी सहभागी,
वाडा तालुक्यातील चिंचघर ग्रामपंचायतने शून्य प्लास्टिक मोहीम हाती घेतली असून या मोहिमेमध्ये चिंचघर गावातील शाळांमधील शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले आहेत.त्यामुळे शून्य प्लास्टिक मोहिमेचे उद्दिष्ट गाठण्यात ग्रामपंचायतला मदत होणार आहे.
वाडा तालुक्यातील चिंचघर ग्रामपंचायत गेल्या दोन वर्षांपासून ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करत असून सुक्या कचऱ्यातून मिळालेले प्लास्टिक पुनर्रप्रक्रियेसाठी पाठवले जाते, पुनर्रप्रक्रियेतून तयार करण्यात आलेल्या विविध दैनंदिन वापराच्या वस्तू ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात वापरण्यात येत आहेत.या प्रकल्पामुळे चिंचघर गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यास मदत झाली आहे.ग्रामपंचायतच्या या प्रकल्पाला सी.ए.सी.आर.व ई.पी.एल.या स्वयंसेवी संस्थांनी मदतीचा हात दिला आहे.
यावर्षी या संस्थांनी चिंचघर ग्रामपंचायतच्या सोबतीने गावात शून्य प्लास्टिक मोहीम हाती घेतली आहे.यासाठी गावात असलेल्या ह.वि.पाटील माध्यमिक विद्यालय,नॅशनल इंग्लिश स्कूल,झेड.ए.मेमन इंग्लिश स्कुल या शाळांमधील शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले आहेत.त्यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांची उद्बोधन शिबिर घेण्यात येत आहेत.तसेच विद्यार्थ्यांना आपल्या घरी व शाळेत प्लास्टिक संकलित करून ते पुनर्प्रक्रियेसाठी जमा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

