दीपक मोहिते,
प्रारूप प्रभाग रचनेवर एकूण १६० हरकती व सूचना प्राप्त,
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार वसई विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -२०२५ करिता प्रभाग निहाय प्रारूप प्रभाग रचना २२ ऑगस्ट, २०२५ प्रसिद्ध करण्यात आली होती.
प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांना हरकती व सूचना सादर करण्यासाठी २२ ऑगस्ट ते ०४ सप्टें.२०२५ असा कालावधी देण्यात आला होता.या कालावधीत वसई विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय, महानगरपालिकेच्या सर्व प्रभाग समिती कार्यालयांमध्ये एकूण १६० हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत.सदर प्राप्त हरकती मध्ये १० मूळ हरकतींसोबत त्याच स्वरूपाचे २ हजार १३० नागरिकांनी सामुहिकरित्या दाखल केलेल्या एका हरकतीचा समावेश आहे.सदर हरकती व सूचना दाखल करणाऱ्या नागरिकांना त्यांच्या हरकतींवर सुनावणी करिता उपस्थित राहण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कळवण्यात येणार असल्याचे महानगरपालिका प्रशासनातर्फे प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हंटले आहे.

