दीपक मोहिते,
” निव्वळ मुजोरी,”
याला पुरुषार्थ म्हणायचा का ?
काल राज्याचे तोंडाळ मंत्री म्हणून ओळख असलेल्या,साधी मराठी भाषा व्यवस्थित बोलता न येणारे व अंगी प्रचंड माज असलेले मंत्री,अशी ओळख असलेल्या अजित पवार यांनी एका महिला अधिकाऱ्याला धमकी दिल्याची व्हिडियो क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर सर्वत्र टीकेची झोड उठत आहे.लाडक्या बहिणींचा निवडणुकीच्या काळात उदो उदो करणारे अजित पवार यांचा खरा चेहरा काल त्यांच्या लाडक्या बहिणींना पाहायला मिळाला.गैर व भ्रष्ट कारभाराचे जनक असलेले अजित पवार हे पूर्वीपासून गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत.त्यांच्या या अतिरेकी स्वभावामुळे ते अनेकदा अडचणीतही आले आहेत.
काल सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे बेकायदेशीर उत्खननावर कारवाई करत असताना, एका महिला आयपीएस अधिकाऱ्याला त्यांनी फोनवरून कारवाई थांबवण्याच्या सूचना दिल्या होत्या.या फोन दरम्यान या अधिकाऱ्यांनी अजित पवार यांना “ तुम्ही थेट मला कॉल करायला पाहिजे होता,” असे म्हटल्यानंतर अजित पवार संतापल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान,अजित पवार यांच्या फोन कॉलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून,या फोनची सर्वत्र चर्चा सुरू आहे.दरम्यान,महिला अधिकाऱ्याला केलेल्या या फोनवरून अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली असून, “ उपमुख्यमंत्र्यांना हे शोभते का ? ” असा सवाल केला आहे.
फोनवर अजित पवार काय म्हणाले ?
स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कारवाई थांबण्याच्या सूचना द्याव्या,यासाठी अजित पवार यांना फोन केला होता.तेव्हा या महिला पोलीस अधिकाऱ्याला फोनवरून अजित पवार म्हणाले की, “ मी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतोय.मी तुम्हाला कारवाई थांबण्याचे आदेश देतोय.तहसिलदारांना सांगा की,अजित पवार यांचा फोन आला होता.मला उपमुख्यंत्र्यांनी कारवाई थांबण्यास सांगितले आहे.”
त्यावर या महिला पोलीस अधिकारी अजित पवार यांना, “ सर,तुम्ही थेट माझ्या फोनवर कॉल करा ना.” अधिकाऱ्याच्या या वाक्यानंतर अजित पवार संतापल्याचे पाहायला मिळाले.ते या महिला अधिकाऱ्याला म्हणाले की, “ मी तुमच्यावर कारवाई करेन.तुम्ही मला सांगत आहात की,थेट कॉल करा. तुमचा नंबर द्या मी कॉल करतो.”
महिला अधिकारी आपले काम करत होत्या,तर इतरांच्या सांगण्यावरून, त्यांना कॉल करून धमकी देणे,एका उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का ? या संभाषणा दरम्यान अजित पवार यांनी तुझी डेअरिंग कशी झाली.असे त्या महिलेला दरडावत विचारले.
याप्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर अजित पवार यांना महिला अधिकाऱ्याचा उपमर्द केल्याप्रकरणी नोटीस बजावणार का ? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.यापूर्वीही हे अजित पवार अनेक प्रकरणी अडचणीत आले होते,अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे,हा त्यांचा स्थायी स्वभाव बनला आहे.त्यामुळे अनेकदा दिलगिरी व्यक्त करण्याची पाळी त्यांच्यावर आली होती.एक उच्चविभूषित पोलीस अधिकारी आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना धमकी देणे,हे असंस्कृतपणाचे लक्षण असल्याची टीका त्यांच्यावर होत आहे.

