अनिकेत मेहेर,डहाणू
महालक्ष्मी गडावर दरड कोसळली,चार दुकाने पडली दरीत…
डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध महालक्ष्मी गडावर झालेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळून सात दुकानांपैकी चार दुकाने दरीत कोसळली. तर इतर दुकानावर दगडी पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
महालक्ष्मी गडाच्या मंदिर परिसरातील दुकानांवर दरड कोसळली असून दरडी सह चार दुकाने दरीत पडून जमीनदोस्त झाली आहेत. तसेच या घटनेमुळे मंदिरात जाणार अरुंद रस्त्यावर परिणाम झाला आहे.सुदैवाने पावसामुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांची वर्दळ कमी होती. त्या मुळे मोठी जीवितहानी टळली आहे.महालक्ष्मी सुळक्यावरून छोट्या मोठ्या प्रमाणात दरड कोसळण्याचे प्रकार काही वर्षांपासून सुरू असून २०२२ साली गडावर अशाप्रकारे मोठी दरड कोसळली होती. या घटनेमध्ये तीन दुकानांचे नुकसान झाले होते.

