सचिन पाटील,विरार
महानगरपालिकेचे ४ अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त,
नियत वयोमानानुसार व स्वेच्छानिवृत्तीने वसई विरार शहर महानगरपालिकेचे एकूण ४ अधिकारी-कर्मचारी आज सेवानिवृत्त झाले.
प्रकाश साटम ( कार्यकारी अभियंता) व राजेश घरत ( उप नगरसचिव ) हे स्वेच्छानिवृत्तीने तसेच संजय कार्व्हालो ( वाहन चालक ) व चंद्रशेखर पाटील ( सफाई कामगार ) हे नियत वयोमानानुसार आज महानगरपालिकेच्या सेवेतून सेवानिवृत्त झाले.आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी ( भा.प्र.से. ) यांच्या हस्ते निवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ,शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला.सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतरच्या लाभांच्या धनादेशाचे वाटपही यावेळी करण्यात आले.याप्रसंगी आयुक्तानी सर्व सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
महानगरपालिकेच्या वतीने सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान व सत्कार करणेसाठी महानगरपालिका मुख्यालयातील सभागृहात सेवापूर्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त दिपक सावंत, उपायुक्त अजित मुठे,उपायुक्त दिपक झिंजाड,सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी व त्यांचे नातेवाईक तसेच महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

