दीपक मोहिते,
अंतस्थ हेतू निराळा आहे….
- मीरा रोड येथे मराठी भाषेच्या अस्मितेवरून झालेले आंदोलन यशस्वी झाल्यानंतर मनसेतर्फे आता मोर्चाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. येत्या १८ जुलै रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मीरा रोड येथे येत आहेत.या त्यांच्या दौऱ्यात ते जाहीर सभा घेतील,अशी अपेक्षा आहे.
मराठी भाषेच्या अस्मितेसाठी मनसेकडून मीरा-रोड येथे नुकताच मोर्चा काढण्यात आला होता.त्यानंतर आता राज ठाकरे मीरा रोड येथे येत आहेत. येत्या १८ जुलै रोजी संध्याकाळी सात वाजता राज ठाकरे मीरारोड येथे दाखल होणार आहेत.मनसेच्या आंदोलनानंतर राज ठाकरे प्रथमच मीरा रोडच्या दौऱ्यावर जात असल्याने सर्वांचं लक्ष त्यांच्या या दौऱ्याकडे लागले आहे.कारण यावेळी राज ठाकरे नेमकी कोणती भूमिका मांडतात,याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान,मीरा-रोडच्या आंदोलनानंतर राज ठाकरे मीरा रोड येथे मराठी जनतेचे आभार मानण्यासाठी जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
पण महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने ही राजकीय खेळी केल्याची चर्चा होत आहे.आगामी निवडणुकीत मराठी अस्मिता,गुजराती समाजाची अरेरावी व सरकारचे गुजराती भाषिकांना पाठीशी घालण्याचे धोरण इ.मुद्याचा प्रचारात वापर करण्याच्या दृष्टीने मनसेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.सरकारकडून हिंदी सक्तीबाबत दोन शासकीय अधिसूचना रद्द करणे व आंदोलनानंतर मनसेच्या मोर्चाला परवानगी देणे,या भागातील मतदारानी मनसेला डोक्यावर घेतले आहे. त्यामुळे येथील जनेतेचे आभार मानण्यासाठी राज ठाकरे येत असल्याचे सांगण्यात येत असले तरी अंतस्थ हेतू निराळाच आहे.

