दिपक मोहिते,
“अनेकांची दयनीय अवस्था,”
अनेक बिल्डर्सना रात्रीची झोप लागत नाही…
ऐन निवडणुकीच्या तोंडावर सक्तवसुली संचलनालयाने ( ईडी ) वसईत धाडी घातल्यामुळे विकासक,आर्किटेक्ट,
दलाल,महानगरपालिकेचे अभियंते व अधिकारी यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.तर बिल्डर्स व आर्किटेक्ट मंडळींची रात्रीची झोप पार उडाली आहे.सक्तवसुली संचलनालयाच्या रडारवर असलेल्या यादीत आपले नाव तर नाही ना ? याची खातरजमा करण्यासाठी ही सर्व मंडळी आपल्या ओळखीच्या माणसाकडे सतत चौकशी करत आहेत.तर प्रतिनियुक्तीवर आलेले मनपाचे अनेक अधिकारीही आता बदली करून घेण्याच्या प्रयत्नात आहेत.महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराचे धागेदोरे थेट मंत्रालयाच्या नगरविकास विभागापर्यंत पोहोचले असल्यामुळे त्या विभागातील अधिकाऱ्यांमध्येही भितीचे वातावरण पसरले आहे.
अनेक बिल्डर्स आपल्या संपर्कातील पत्रकारांना कॉल करून सतत विचारणा करत असतात.या सर्व घडामोडीमुळे एक मात्र सिद्ध झालं आहे की,वाम मार्गाने कमवलेला पैसा,हा रात्रीची झोप हिरावून घेत असतो.अनेक बिल्डर्स हे आपल्या निकटवर्तीय मित्रमंडळीमध्ये सतत बोलत असतात.महानगरपालिकेचे खालील विभागामध्ये गेली पंधरा वर्षे प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे.ते विभाग खालीलप्रमाणे आहेत. नगररचना,सार्वजनिक बांधकाम,महिला व बालकल्याण,इलेक्ट्रिक व आरोग्य विभाग,अग्निशमन विभाग,पाणीपुरवठा,( साहित्य खरेदी ) व ०९ प्रभाग समित्यांचे प्रभारी सहा.आयुक्त, हे सारे तपास यंत्रणेच्या रडारवर आहे.सक्तवसुली संचलनालयाच्या धडक मोहिमेनंतर आयकर व प्राप्तिकर विभाग देखील या सर्व मंडळींना चौकशीसाठी पाचारण करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.या सर्व घडामोडीवरून एकच निष्कर्ष निघतो,तो म्हणजे ” पापाचा घडा हा एकदाच भरतो,” तो भरला की नियती कोणालाही सोडत नाही.पैश्याच्या गुर्मीत व अहंकाराने हे सारे पालथे पडले,आता त्यांच्यावर उताणे पडण्याची पाळी आली आहे.वेळ कधीही सांगून येत नसते,पापाचा घडा जेव्हा भरतो तेंव्हा नियती गालातल्या गालात खुदकन हसत असते व ती हळुवारपणे आपला तिसरा डोळा उघडते.ईडीने केवळ बिल्डर व आर्किटेक्ट यांच्यावर कारवाई करू नये,त्यांच्यासोबत ठेकेदार,महानगरपालिकेचे अभियंते,दलाल यांच्या बँक खात्यांचा काटेकोरपणे तपास करावा,तरच या महंगारपालिकेतील भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून निघतील.नालेसफाई,
बाजारकर,सार्वजनिक बांधकाम विभागाचे सारे ठेके हे बेनामी असून या ठेकेदारांची बँक खाती तपासल्यास ठेकेदारांच्या पडद्यामागचे मास्टरमाइंड कोण आहेत.या मंडळींनी आपला पैसा कसा लुटला, हे जगासमोर येईल.लोक ही प्रक्रिया कधी सुरू होते,अशा प्रतिक्षेत आहेत.

