सचिन पाटील,वसई,
नालासोपारा येथे वारीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,
नालासोपारा यंग स्टार ट्रस्टतर्फे आयोजित आषाढी एकादशी निमित्त ” वारी विठ्ठलाची,” या उपक्रमाला भर पावसात नालासोपाऱ्याच्या चे नागरिकांनी प्रतिसाद दिला.
” विठ्ठल माझा….. मी विठ्ठलाचा,”
या नादाने संपूर्ण नालासोपारा शहर दुमदुमले.बार्शी येथील वारकरी गुरुकुलमधील लहान वारकऱ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.राजीव गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लेझीमच्या तालावर तमाम वारकऱ्यांना उत्साहीत केले. यावेळी निघालेल्या दिंडीत लहान मुले,शालेय विद्यार्थी,तरुण,ज्येष्ठ नागरिकानी सहभागी झाले होते.यातील काही मुलांनी विठ्ठल रखुमाई संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम,वासुदेवाची वेशभूषा केली होती.
सदर कार्यक्रमास माजी आ.क्षितीज ठाकूर इतर सहकाऱ्यासह सहभागी झाले होते.तसेच सदर कार्यक्रमास अतुल साळुंखे,
किशोर पाटील,नरेश जाधव, शुभांगी गायकवाड हे उपस्थित होते.सदर दिंडी पंचमुखी हनुमान मंदिर ते साई चैतन्यधाम मंदिर या दरम्यान काढण्यात आली होती.
यावेळी जीवदानी ट्रस्ट तर्फे नागरिकांना साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले.

