सुरेश काटे,तलासरी,
तलासरीत ” एक झाड आईसाठी,” स्तुत्य उपक्रम,
” एक झाड आई,साठी,” या अभियानांतर्गत तलासरी तालुक्यातील इंडिया कॉलनी या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी,कॉलनीतील नागरिक सहभागी झाले होते.
” एक झाड आई साठी,” या अभियान अंतर्गत वड, आवळा,बेहडा,करंज, गुलमोहर अशा वेगवेगळ्या ४० औषधी वनस्पती लावण्यात आल्या.
या सर्व रोपांना दत्तक घेण्यात आले.सदर रोपाची देखभाल जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
लक्ष्मण ननवरे,अशोक थोरात, डॉ मोहन गायकवाड,जयराम कवडे,रेंजा गावित,अनिल मिश्रा,धनाजी कांबळे,दशरथ मोहरा,रीना जोशी,विनिता बाणे,संदेश गावित,विनिता दोषी,विजय दोशीअनिल पाडवी,कौशिक चौधरी,अनिल जमादार,हेमेंद्र पटेल,साईनाथ पवार,सिंगरिया इ. मान्यवर या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
” एक झाड आईसाठी,” अभियानमध्ये वरिष्ठ नागरिकांनी सहभागी होऊन वृक्षारोपण केले. प्रत्येकाने झाड दत्तक घेऊन त्याची जबाबदारी घेतली.
वाढते तापमान,प्रदूषण रोखण्यासाठी वृक्षारोपण करणे काळची गरज बनली आहे.. प्रत्येक नागरिकाने जबाबदारी ओळखुन किमान ४ झाडे लावून त्यांची जोपासना केल्यास धोके टाळता येतील.आपली वसुंधरा हरीत,सुंदर ठेवण्याची सर्वांची जबाबदारी आहे…
” पर्यावरण रक्षण व आईबद्दल सन्मान या दोन्हीचा संगम म्हणजे ” एक झाड आईसाठी, ” हा उपक्रम होय, – लक्ष्मण ननवरे,

