दीपक मोहिते,
” बाळबोध, ”
पहिलीपासून पाठ्यपुस्तकात या धड्याचा समावेश करण्यात यावा,
१ ) गद्दारी कशी करतात ?
२ ) गद्दारी करण्यासाठी किती मोबदला ( पेट्या किंवा खोके ) दिला जातो ?
३ ) गद्दारी केल्यानंतर लाभार्थ्यांना खोक्या व्यतिरिक्त अन्य कोणकोणते लाभ मिळतात ? ( खासदारकी,आमदारकी,मंत्रिपदे व महामंडळाची अध्यक्ष किंवा संचालकपदे )
४ ) गद्दारी करणाऱ्यांच्या मुलाबाळाना कोणते लाभ मिळतात ?
५ ) गद्दारी करणाऱ्या गद्दारांची सारी पापे स्वच्छ धुतली जातात का ?
६ ) गद्दारांची पापे धुण्यासाठी कोणते वॉशिंग पावडर वापरले जाते ?
या सगळ्या विषयांची माहिती या विद्यार्थ्यांना मिळावी,त्यासाठी शासनाच्या शिक्षण विभागाने एखादी अभ्यास समिती नेमावी.हे पाठ्यपुस्तक बाजारात आले की मग हिंदी भाषेची सक्ती करावी की न करावी ? या ज्वलंत प्रश्नावर अभ्यास गट स्थापन करण्यात यावा..

