वसंत भोईर,वाडा
वाडा – भिवंडी रस्त्याची दुरावस्था,
भिवंडी- वाडा – मनोर महामार्गाची दुरवस्था ; रिक्षा चालकांमध्ये संताप,
भिवंडी – वाडा – मनोर महामार्गाचे गेल्या सात महिन्यांपासून नूतनीकरणाचे काम कासवाच्या गतीने सुरू आहे.सध्या खड्ड्यातून एक दिशेने वाहतूक सुरु आहे.
त्यामुळे वाहतूक कोंडीसह अपघातांना तोंड द्यावे लागत आहे.रस्त्याच्या प्रचंड दुरावस्थेमुळे वाहनांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे.
वाहनचालक व प्रवाशांना कंबर दुखी,पाठ दुखी असा असा त्रास सुरू झाल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
भिवंडी- वाडा- मनोर या ६४ कि.मी.अंतराच्या महामार्गासाठी ८०३ कोटी रु.चा निधी देण्यात आला आहे.या कामाचा ठेका ईगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड या कंपनीकडे आहे. या कंपनीकडून एका बाजूचे काम सुरू असून,तेही अर्धवटअवस्थेत आहे.तर वाहतूक सुरू असलेल्या एकेरी मार्गाचीही प्रचंड दुरावस्था झाली आहे.या रस्त्यावर गुडघाभर खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
तीन दिवसापूर्वी नेहरोली गावाजवळ एक ट्रक खड्ड्यात अडकला होता.तो बाहेर काढताना ट्रकचे खूप नुकसान झाले,तर दुसऱ्या दिवशी सकाळी डाकिवली फाटा येथे एक ट्रेलर उलटला.पलटी झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या भोंगळ कारभाराचा नागरिक तीव्र शब्दात निषेत व्यक्त करत आहेत.

