दीपक मोहिते,
बकासुर उपायुक्त,नराधमाच्या भूमिकेत,
भ्रष्ट व्यवस्थेला आम्ही प्रश्न विचारणारच,
आम्ही व्यवस्थेवर प्रहार करतो, त्यांना प्रश्न विचारतो,त्यामुळे मूठभर भ्रष्ट राजकीय नेत्यांचे पित्त खवळते.त्यांचं ” पित्त खवळणं,” ही आमच्यासाठी एकप्रकारची पोचपावतीच असते.जेंव्हा त्यांचा संताप होतो,त्यावेळी आमचा घाव त्यांच्या वर्मी बसल्याचे आम्ही मानतो.ज्यावेळी आमच्यावर राजकीय नेत्यांचे फंटर्स तोंडसूख घेतात,त्यावेळी तर आम्हाला असुरी आनंदच होत असतो.
व्यवस्थेतील गैरप्रकार व भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आणण्याकामी आम्हाला वेगळीच ऊर्जा मिळत असते. एसटीपी प्रकल्पाच्या उभारणीच्या कामात एका राजकीय नेत्याने,तुमच्या – आमच्या तीनशे कोटी रु.चा कसा चुराडा केला ते लवकरच वाचा.तर एका बिल्डर समूहाने गोरगरीब रहिवाशांच्या गृहनिर्माण संस्थेची अतिरिक्त जमीन बळकावून टोलेजंग इमारत कशी बांधली.यावर लवकरात लवकर आमचे वेबपोर्टल प्रकाशझोत टाकणार आहे.याविषयीची कागदपत्रे देण्यासंदर्भात महानगरपालिका प्रशासन गेल्या दोन महिन्यापासून टाळाटाळ करत आहे.या महानगरपालिकेतील एक उपायुक्त सत्ताधारी पक्षाच्या एका कार्यकर्त्यांच्या टोलेजंग इमारतीला नोटीस देण्यासाठी एका महिला प्रभारी सहा. आयुक्तावर कसा दबाव टाकत होता.दबाव टाकून अनधिकृत इमारत बांधणाऱ्याकडून भली मोठी रक्कम वसुल करण्यासाठी त्या महिला सहा. प्रभारी आयुक्तावर प्रचंड दबाव टाकत होता.पण त्या महिला अधिकाऱ्यांने दबावाला जुमानले नाही.त्यामुळे त्या महिलेला अडकवण्यासाठी त्याने कसे प्रयत्न केले.हे ही लवकरच एक माहिती अधिकार कार्यकर्ता उघडकीस आणणार आहे.

