नदीम शेख,पालघर,
विविध पक्षातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश..
पालघर विधानसभेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरणारे माजी आ.अमित घोडा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला.
त्यांच्या प्रवेशाने पालघर डहाणूतील ग्रामीण भागात पक्षसंघटनेला बळ मिळणार आहे.तसेच डहाणू विधानसभेचे मनसेचे उपजिल्हाप्रमुख विपुल पटेल, आगवन ग्रामपंचायतचे सरपंच रुपजी कोल,मच्छीमार समाजाकरता कार्यरत असलेले कुंदन दवणे,दांडी सोसायटीचे चेअरमन नंदकुमार तामोरे,रिक्षा संघटनेचे संदीप पाटील जगदीश ठाकूर,उत्तर भारतीय समाजाचे राजू शर्मा,डहाणू काँग्रेसचे जितू पटेल ,डहाणू मनसे महिला शहर अध्यक्ष शोभा खताळ तसेच शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्कमंत्री म्हणून प्रताप सरनाईक यांची नेमणूक केल्यानंतर त्यांनी आयोजित केलेल्या लोकदरबारातून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावले. जिल्हा काही दिवसांपूर्वी पालघर विधानसभेचे आमदार राजेंद्र गावित व बोईसर विधानसभेचे आ.विलास तरे यांनी ” आमदार आपल्या दारी, ” हा उपक्रम राबवला होता.या सर्व घडामोडीवरून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना पूर्ण शक्तीनिशी उतरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
मुंबई येथे झालेल्या पक्षप्रवेशाप्रसंगी शिवसेनेचे संपर्क मंत्री प्रताप सरनाईक, जिल्हाप्रमुख कुंदन संखे,शिवसेनेचे पालघर विधानसभेचे आ.राजेंद्र गावित,बोईसर विधानसभेचे आ.विलास तरे, जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण,सहसंपर्कप्रमुख केदार काळे,उपनेत्या ज्योती मेहेर,उपनेते जगदीश धोंडी, यांच्यासह शिवसेनेचे जिल्ह्यातील असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

