सुरेश काटे,तलासरी
बंधाऱ्याच्या पाण्यात पडून एकाचा मृत्यू
अंघोळीसाठी बंधाऱ्याच्या पाण्यात उतरलेल्या एका इसमाचा नाका,तोंडात पाणी जाऊन मृत्यू झाल्याची घटना तलासरी पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून याबाबत तलासरी पोलीस स्टेशनाला आकास्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
काल संध्याकाळी साडेचारच्या दरम्यान दापचरी येथील महादेव मंदिरा समोर असलेल्या नदीवरील बंधाऱ्याच्या पाण्यात अंघोळ करण्या साठी उतरलेल्या भूपेंद्र चिमणलाल प्रजापती वय ५७ वर्ष रा.मदनवाड मिस्त्री चाळ तालुका बलसाड जिल्हा बलसाड राज्य गुजरात,यांचा बंधाऱ्यातील पाणी नाका तोंडात जाऊन मृत्यू झाला,याप्रकरणी
तलासरी पोलीसानी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

