संजय लांडगे,वाडा
मासिक पाळी विषयी जनजागृती;एक स्तुत्य उपक्रम,
समाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन,मुंबई यांच्यातर्फे वाडा तालुक्यातील कळंभे येथे फाउंडेशनच्या वाडा युनिटच्या माध्यमातून मासिक पाळीत बाळगायची स्वछता, घ्यायची काळजी व जनजागृती संदर्भात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.उत्कर्ष प्रशिक्षक प्रणाली पाटील यांचे याकामी सहकार्य लाभले.महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमास महिलांसोबतच पुरुषांनीही उत्तम प्रतिसाद दिला.
याप्रसंगी डॉ.अपर्णा पाल यांनी मासिक पाळीबाबत उपस्थित मुली व महिलांना मार्गदर्शन केले.याप्रसंगी कळंभे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.

