दीपक मोहिते,
१९ मार्च रोजी विरार पूर्व भागात इफ्तार पार्टीचे आयोजन,
सालाबादप्रमाणे यंदाही अंजुमन – ए – इस्लाम,या संस्थेतर्फे बुध.१९ मार्च रोजी सां.६.०० वाजता इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमासाठी आयोजकांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित केले आहे.यंदाचे हे ३३ वे वर्ष आहे.दरवर्षी संस्था मोठ्या उत्साहात इफ्तार पार्टीचे आयोजन करत आली आहे.
अंजुमन – ए – इस्लाम ही संस्था गेली तीन दशके शिक्षण,सामाजिक व आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे.संस्थेतर्फे आजवर शेकडो उपक्रम राबवण्यात आले आहेत.सामाजिक सलोखा व बंधुभाव हा संस्थेचा पाया असून संस्था गोरगरीब विद्यार्थ्यांना आपल्या परीने शैक्षणिक साहित्य व इतर मदत करत असते.
विरार पूर्व भागातील मंगल हॉल,चंदनसार विरार येथे होणाऱ्या या इफ्तार पार्टीला माजी आ.हितेंद्र ठाकूर,पालघरचे आ.राजेंद्र गावित,बोईसरचे आ.विलास तरे,पालघर जिल्हा परिषदेचे प्रकाश निकाम,आम आदमी पार्टीचे जॉन परेरा,सेनेचे पंकज देशमुख,आगरी सेनेचे कैलास पाटील,काँग्रेसचे विजय पाटील,फा.मायकलजी व कुलदीप वर्तक,यांना निमंत्रित करण्यात आले आहे.या इफ्तार पार्टीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन संस्थेचे सरचिटणीस ऍड. खलील शेख यांनी केले आहे.

