दीपक मोहिते,
सामाजिक कार्यकर्ते मनोज कामडी,आदर्श समाजरत्न पुरस्काराने सन्मानित,
सामाजिक बांधिलकीतून निस्वार्थ सेवा करणाऱ्या आणि समाजासाठी भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने माणुसकी मल्टिपर्पज फाऊंडेशन, मलकापूरच्या वतीने ” राष्ट्रभक्ती सेवा गौरव पुरस्कार २०२५,” राज्यस्तरीय वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.हा भव्य सोहळा १६ मार्च २०२५ रोजी तालुका शिक्षक संघ पतसंस्था हॉल, ४० बिघा,मलकापूर,जि. बुलढाणा येथे पार पडला.
या कार्यक्रमात पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील शिरोशी गावातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व तालूका व्यवस्थापक पेसा मनोज कामडी यांना ” आदर्श समाजरत्न पुरस्कार,” देऊन गौरवण्यात आले.ग्रामीण व आदिवासी भागातील गरजू नागरिकांना मदतीचा हात देणारे,महिला सक्षमीकरण व ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे मनोज कामडी यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ समाजसेवक संतोष सुर्यवंशी हे होते.तसेच विशेष अतिथी म्हणून प्रा.अतुल सूर्यवंशी ( प्रसिद्ध शिक्षणतज्ञ, जळगाव ) आणि सचिनभाऊ भंसाली ( अध्यक्ष,ओम शांती सेवा समिती,मलकापूर ) उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन मनोज कामडी यांना गौरवण्यात आले.कार्यक्रमात राज्यभरातील विविध सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले.या भव्य समारंभाचे सूत्रसंचालन रवींद्र देवरे ( मलकापूर ) यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माणुसकी मल्टिपर्पज फाऊंडेशन, मलकापूरचे संस्थापक अध्यक्ष विवेक राजपूरे व संस्थेचे सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.या सन्मानाने मनोज कामडी यांच्या सामाजिक कार्याला नवी उंची मिळाली असून,समाजसेवेसाठी सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांसाठी हा गौरव प्रेरणादायी ठरणार आहे.
news27.in media परिवारातर्फे आमचे सदस्य मनोज कामडी यांचे मनःपूर्वक अभिनंदन,

