सुशील भोईर,वसई पूर्व
कामण येथे सिद्धार्थ फाउंडेशनतर्फे कॅन्सर निदान शिबीर संपन्न,
कामण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सिद्धार्थ फॉउंडेशन व इंडियन कॅन्सर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने काल कॅन्सर निदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
बदलत्या जीवनशैलीमुळे व भेसळयुक्त खाण्याच्या पदार्थामुळे कॅन्सरचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढत आहे. कॅन्सरमुळे मृत्यूचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. सिद्धार्थ फाउंडेशनचे अध्यक्ष तथा कामण ग्रामपंचायतचे माजी सरपंच ऍड.दिनेश हरेश्वर म्हात्रे यांच्या पुढाकाराने कॅन्सर निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरामध्ये मौखिक कॅन्सर तसेच स्त्रीरोग तज्ञाकडून स्त्रियांमध्ये आढळणारा स्तन व गर्भाशाय कॅन्सरची तपासणी करण्यात आली.त्यामध्ये एकूण साठ लोकांची तपासणी झाली.
यामध्ये स्त्रियांची संख्या लक्षणीय होती.
सदर शिबिरात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा व त्यातून प्राथमिक स्तरावर जर कॅन्सर असेल तर त्यावर उपचार करून रुग्णांवर उपचार करून त्यांचे प्राण वाचवण्याचा आयोजकांचा उद्देश आहे.
सदर कार्यक्रमाचे उदघाटन जि.प.सदस्य कृष्णा माळी, पोमण ग्रा.पं.सरपंच आत्माराम ठाकरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.प्रकाश म्हात्रे,डॉ. कुलकर्णी,पाल ( योगीजी ), पिंटो गुप्ता,शिवम यादव, लक्ष्मी शुक्ला,पंकज शुक्ला, गुंजा विश्वाकर्मा व इतर मान्यवरांनी या शिबिराला हजेरी लावली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेविका प्रीती दिनेश म्हात्रे,जॉयसन परेरा,कल्पक म्हात्रे,रुपसिंग बँसी,रणजित हातकर व परेरा यांनी मेहनत घेतली.

