सुरेश वैद्य,सफाळे,
पालघर जिल्हा परिषदेत यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी,
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची जयंती आज जिल्हा परिषद पालघर येथे साजरी करण्यात आली.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे,प्रकल्प संचालिका डॉ. रूपाली सातपुते,उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप,प्रकल्प संचालक ( जलजीवन मिशन ) अतुल पारसकर,जिल्हा कृषी विकास अधिकारी सोमनाथ पिंजारी, कार्यकारी अभियंता ( बांधकाम ) जागृती संखे तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
यशवंतराव चव्हाण यांचा जन्म १२ मार्च १९१३ रोजी सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्रे गावात झाला.स्वातंत्र्यपूर्व काळात ते स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभगी होते.स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी त्यांनी अपार प्रयत्न केले आणि १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या विकासाची भक्कम पायाभरणी केली.अशा थोर महापुरुषाची जयंती आज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.