वसंत भोईर,वाडा
क्षयरोगाच्या जनजागृतीसाठी घोणसई गावात प्रचारफेरी,
केंद्र सरकारतर्फे क्षयरोग देशमुक्त अभियान राबवण्यात येत असुन त्याचाच एक भाग म्हणून आज घोणसई गावात कुडूस आरोग्य विभाग व घोणसई ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने प्रचार फेरी काढून गावात जनजागृती करण्यात आली.
” टिबी हरेल,देश जिंकेल, दोन आठवड्याचा खोकला डाॅक्टरांना भेटा,” आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या.यावेळी डाॅ.आफताब शेख यांनी क्षयरोगाविषयी माहिती नागरिकांना दिली.
आरोग्य विभागाचे डाॅ.शिरीष खैरनार,डाॅ.तनुजा पाटील,आरोग्य सहा. गणेश गायकवाड,आरोग्य सेवक अविनाश शिंदे,घोणसई ग्रामपंचायतीच्या सरपंच शैला जाबर,उपसरपंच विशाल पाटील,सदस्य दिलीप पाटील, ग्रामपंचायत अधिकारी तेजस भुजबळ आदींसह विद्यार्थी प्रचार फेरीत सहभागी झाले होते.

