भूषण वर्तक,केळवे,
पालघर जिल्हा परिषदेच्या २१५ कामांचे पारदर्शक पद्धतीने वाटप,
पालघर जिल्हा परिषदेच्या जिल्हा कामवाटप समितीकडून २७ फेब्रु.रोजी कामवाटप सभेचे आयोजन करण्यात आले.यासाठी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांनी मंजुरी दिलेली १० लाख रुपयांपर्यंतची एकूण २१५ कामे बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या नोटीस फलकावर ठळकपणे प्रकाशित करण्यात आली होती.
जिल्हा कामवाटप समितीचे अध्यक्ष,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सचिव व कार्यकारी अभियंता जागृती संखे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही सभा हुतात्मा सभागृह,जिल्हा परिषद,पालघर येथे पार पडली.
जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंते आणि मजूर कामगार सहकारी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने या प्रक्रियेत सहभागी झाले होते.पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने लॉटरी प्रक्रियेच्या माध्यमातून एकूण २१५ विकासकामांचे वाटप करण्यात आले.
या प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील अभियंते आणि स्थानिक सहकारी संस्थांना संधी मिळाली असून,विकासकामे वेगाने आणि न्याय्य पद्धतीने पूर्ण होतील,असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

