संजय लांडगे,वाडा,
लाखो भाविकांनी घेतले तिळसेश्वराचे दर्शन,
वाडा तालुक्यातील तीळसा येथील प्राचीन शिवमंदिरात महाशिवरात्री निमित्त तिळसेश्वराच्या दर्शनासाठी शिवभक्तांची गर्दी उसळली होती. वाडा शहरापासून नऊ कि.मी.अंतरावर असलेले महादेवाचे मंदिर हे वैतर्ना नदीपात्रात अखंड दगडावर बांधलेले असून ते पुरातन असल्याने दरवर्षी याठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवसी मोठी जत्रा भरते.
ठाणे व पालघर जिल्ह्यातील अनेक भक्त शिव दर्शनासाठी येथे येथे येत असतात.
येथील पाण्यात मोठ मोठे देवमासे असल्याने त्यांना पाहण्यासाठी गर्दी होत असते, तर हे मासे फक्त महाशिवरात्रीच्या दिवशी दिसतात अशी भक्तांची धारणा आहे.
यावर्षीही लाखोंच्या आसपास भक्तांनी दर्शन घेतले,दरम्यान वाडा पोलिसांचे एकूण दोनशे अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तात सहभागी होते.वाडा पोलिसांनी
वाहतूक व्यवस्थेसह चोख बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

