संजय लांडगे,वाडा
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी सुनिल पाडवी,
वाडा शहरातील शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेल्या
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी सुनिल दावा पाडवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पाडवी हे गेली तीन दशके शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.त्यांना २६ वर्षाचा अध्यापनाचा अनुभव असून त्यांनी यापूर्वी प्रभारी मुख्याध्यापकपदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यावेळी मुख्यमंत्री ” माझी शाळा,सुंदर शाळा,” या उपक्रमात सहभागी होऊन उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यांचे शैक्षणिक कार्य व अनुभव याची दखल घेऊन संस्था व शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.शिक्षण,हे गाव पाड्यावरील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणे आवश्यक असुन प्रत्येक पाड्यावरील मुलगा-मुलगी शिक्षणाच्या प्रवाहात पोहोचला पाहिजे.ज्यामुळे त्या विद्यार्थ्यांसोबत त्या परिवाराचा व गावपाड्यांचा विकास होईल. शिक्षणाचा प्रवाह हा प्रत्येक खेड्या-पाड्यापर्यंत पोहचावा यासाठी ते विशेष प्रयत्न करणार आहेत.पाडवी यांच्या पदोन्नतीमुळे रिक्त असलेला उपप्राचार्यपदी हेमंत जानकीराम फुलपगारे यांची नियुक्ती झाली असून या दोघांचे सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.

