संजय नेवे,विक्रमगड,
राज्यस्तरीय आदिवासी आढावा समितीची विक्रमगड येथे शासकीय अधिकाऱ्यांसमवेत बैठक,
राज्यस्तरीय आदिवासी विकास आढावा समितीची विक्रमगड तालुक्यातील आदिवासी योजनेचा आढावा घेण्यासाठी विक्रमगड पंचायत समिती हॉलमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती.
या आढावा बैठकीत आदिवासी विभागातर्फे विविध यंत्रणाना देण्यात येणारा निधी आदिवासींचा विकासासाठी योग्यरीत्या खर्च केला जात आहे का ? याची पडताळणी व माहिती घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी बांधकाम विभागा अंतर्गत ग्रामीण भागात रस्त्यांच्या जाळ्यासाठी लाखो रु.चा निधी आदिवासी विभाग देत असून या निधीचा फायदा ग्रामीण मिळतो का ?याविषयी आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.विक्रमगड तालुक्यामध्ये रस्त्यासंदर्भात अनेक तक्रारी या बैठकीत मांडण्यात आल्या.त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्हा परिषद बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रधानमंत्री सडक विभाग,या तिन्ही विभागाने संयुक्त पहाणी करून झालेल्या रस्त्यांची तपासणी करण्याच्या सूचना विवेक पंडित यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.ज्या गावांना रस्तेच नाही आहेत,अशा गावांचा सर्वेक्षण करण्याचा आदेश प्रकल्प अधिकारी करिष्मा नायर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
विक्रमगड तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांचाही आढावा या बैठकीत घेण्यात आला.
या आढावा बैठकीनंतर जिल्हा अधिकाऱ्यांसमवेत एक संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याचे,यावेळी सांगण्यात आले.या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता ग्रामसडक विभाग कार्यकारी अभियंता आदिवासी विभाग प्रकल्प कार्यालयातील अधिकारी,जलसंपदा विभागाचे अधिकारी पाणीपुरवठा अधिकारी, आरोग्य अधिकारी,बाल विकास अधिकारी व ग्रामसेवक उपस्थित होते.

