सुरेश काटे,तलासरी
राजभवन येथे दादरा नगर हवेली आणि दीव दमणचा निर्मिती दिन संपन्न,
मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक विभागाने राजभवन येथे उत्तर प्रदेश,दादरा नगरहवेली आणि दीव दमण निर्मिती दिवसनिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमामध्ये कॉ. गोदावरी शामराव पुरुळेकर महाविद्यालय तलासरीच्या विद्यार्थ्यांनी तारपा नृत्य सादर केले.तसेच वाडा येथील महाविद्यालय व विद्यापीठाचे काही विद्यार्थ्यांनी देखील विविध कार्यक्रमातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले.
राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन विद्यार्थ्यांचे कौतुक करताना म्हणाले, ” एक तारपा व एक काठी, ” च्या माध्यमातून एक मोठा समूह सुंदर नृत्य करू शकतो,” हे अप्रतिम आहे.त्यांनी यावेळी सर्वच उपक्रमांची कौतुक केले व कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर महाविद्यालयाच्या १७ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.तसेच सहभागी महाविद्यालयांचा घवघवीत बक्षीसे देऊन सन्मान केला.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव प्रवीण दराडे तसेच मुंबई विद्यापीठाचे प्रकलगुरू डॉ.अजय भामरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भगवानसिंग राजपूत,वाडा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. किशोरी भगत व विद्यार्थी कल्याण विभागाचे प्रमुख प्रा. डॉ.सुनिल पाटील तसेच सांस्कृतिक विभागाचे प्रमुख निलेश सावे व राज्यपालांचे प्रतिनिधी कुलकर्णी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली व कार्यक्रमाचे सुंदर आयोजन केले.

